अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2021 :- नगर शहरातील सारसनगर परिसरात चार जणांच्या टोळक्याने दुकानदारावर लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अमजद राजू शेख (रा. टाकळीकाझी ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यानुसार भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात तैमूर उर्फ अल्तमश शेख, ऋषीकेश अशोक बडे, अविनाश जायभाय, नितीन किसन लाड (सर्व रा. सारसनगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, चिकन व्यावसायिक शेख यांच्याकडून आरोपींनी दोन दिवसांपूर्वी दोन किलो चिकन पैसे न देता नेले होते व दुकानाचा हप्ता द्यावा लागेल, अशी दमबाजी केली होती.
त्यानंतर बुधवारी सायंकाळी हे चौघे पुन्हा चिकन दुकानात आले व तु हप्ता दिला नाही त्यामुळे पुन्हा चिकन दे, अशी मागणी केली. त्यास शेख यांनी नकार दिला असता या आरोपींनी त्याच्यावर लोखंडी रॉड,
लाकडी दांडक्याने खुनी हल्ला करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच दुकानातील पाच हजार रुपयांची रोकड बळजबरीने हिसकावून नेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम