धक्कादायक! महापालिका पोटनिवडणुकितील उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :-  नगर शहरात महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 क साठी होत असलेल्या पोटनिवडणुकीचे अपक्ष उमेदवार ऋषिकेश बालय्या गुंडला यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.(amc news) 

दरम्यान या प्रकरणी तोफखान पोलिस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, ऋषिकेश गुंडला प्रभाग क्रमांक 9 क च्या पोटनिवडणुकीत उभे असून,

ते 16 डिसेंबर रोजी निलक्रांती चौक, सिद्धीबाग परिसरात फेरफटका मारण्यासाठी गेले होते. त्यांना अज्ञात व्यक्तीने विनाकरण शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी गुंडला यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तीविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe