अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर मधील केडगाव येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला नाचगाण्या साठी भाग पाडणाऱ्या संबंधित महिलेला जामखेड येथून कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे व त्या अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका केली आहे.
संबंधित आरोपीला न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेतआरोपींमध्ये नंदिनी बाळासाहेब काळापहाड, राहणार जामखेड ,असे पकडलेल्या महिलेचे नाव आहे केडगाव येथे राहणारी 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही त्या ठिकाणी थांबली असताना
जामखेड येथील कला केंद्र मध्ये काम करणाऱ्या एका महिलेने तिचे अपहरण केले होते, यासंदर्भात कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता संबंधित मुलीला पळवून नेऊन जामखेड येथील कला केंद्रावर नाच-गाणे करण्यासाठी नेल्याचे उघड झाले होते .
संबंधित मुलीच्या घरच्यांनी तिचा बऱ्याच ठिकाणी शोध घेतला होता पण ती मिळून आलेली नव्हती , त्या अल्पवयीन मुलीला जामखेड येथे गेल्यावर तिला ज्या प्रकारची अमानुषपणे वागणूक देण्यात येत होती तिला ती कंटाळली होती, तिने आजूबाजूच्या नागरिकांशी संपर्क करून
तिने आपल्या घरी दुसऱ्याच्या फोनवरून फोन करून मला जामखेड येथे आणलेले आहे व मी या ठिकाणी आहे व मला या ठिकाणी खूप त्रास दिला जात आहे माझी सुटका करा असे सांगितले.
पोलिस पथक जामखेड येथे संबंधित कला केंद्राच्या ठिकाणी गेले व त्या ठिकाणाहून त्यांना ती अल्पवयीन मुलगी त्या ठिकाणी आढळून आली, पोलिसांनी त्यांची सुखरूप सुटका करून तिला नगर येथे आणले व नातेवाईकाच्या हवाली केले ज्या महिलेने तिला पळून नेले होते त्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम