अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2021 :- मोक्कातील आरोपी विश्वजीत रमेश कासार यास जिल्हा रुग्णालयातील कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट देत असल्याचा आरोप लता बाबासाहेब भालसिंग (रा. वाळकी, ता. जि. अहमदनगर) यांनी केला आहे.
तसेच या गुन्हेगारावर तसेच संबंधित पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी भालसिंग यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. याबाबत भालसिंग यांनी म्हटले की, माझा मुलगा ओंकार भालसिंग याचा विश्वजीत रमेश कासार या गुंडाने खून केला होता. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
परंतु आरोपी विश्वजीत कासार हा सध्या नगर जिल्हा कारागृह येथे आहे. तो वारंवार जेल प्रशासनाला आरोग्याचे कारण देऊन त्यांची दिशाभुल करुन जिल्हा रुग्णालय येथे असलेल्या कारागृहामध्ये दाखल होतो व तेथे उपचार घेण्याचे नाटक करतो. तो आरोपी असल्याने त्यांचे काही गुंडांसोबत संबंध आहेत.
त्या गुंडांना तो त्याठिकाणी बोलवुन घेतो. काही गुंडांनी त्याच्या सोबत फोटो देखील काढले आहेत. समाज माध्यमावर ते फोटो व्हायरल करुन दहशत माजवत आहे.
विशेष म्हणजे पोलिस बंदोबस्तात आरोपी अटक असतांना त्यांच्या पर्यंत मोबाईल जातो कसा? असा सवाल करत मला या सर्व प्रकरणात मदत करत असलेला विष्णु भिवा कासार व मला, माझ्या कुटुंबीयांना संपवण्याचा डाव तो आतमध्ये आखतोय, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
माझे व विष्णु कासारचे काही बरे वाईट झाल्यास सर्वस्व पोलिस प्रशासन जबाबदार राहील. आमच्या जिवीतास धोका आहे. आम्हाला पोलिस संरक्षण मिळावे. अशी मागणी भालसिंग यांनी केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम