Ahmednagar News:शहरात एका अल्पवयीन तरूणीवर ओळखीच्यानेच वारंवार अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे.
याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार बोल्हेगाव येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी आणि पिडीत मुलीचे कुटुंब एकमेकांच्या ओळखीचे आहे.
त्यामुळे आरोपी आणि पिडीतेची देखील ओळख होती. दि. १५ फेब्रुवारी रोजी पिडीत तरूणीला आरोपीने त्याच्या घरी बोलावत माझे तुझ्यावर प्रेम आहे, तु माझ्यासोबत शरिर संबंध ठेव असे म्हणत गैरवर्तन करत बळजबरीने अत्याचार केला.
याबाबत कोणाला काही सांगितल्यास पिडीतेसह तिच्या आईला जिवे मारण्याची धमकी आरोपीने दिली. त्यानंतर तीन ते चार वेळेस आणि दि. ४ जुलै रोजी आरोपीने पिडीतेवर बळजबरीने अत्याचार केला.
दि. ५जुलै रोजी पिडीत तरूणी घरात रडत असल्याने तिच्याकडे विचारपूस केल्यानंतर तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पिडीतेचे आई-वडिल आरोपीकडे याबाबत विचारणा करण्यासाठी गेले असता आरोपीने त्यांना शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तोफखाना पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.