धक्कादायक ! सतरा वर्षीय बेपत्ता युवकाचा मृतदेह सापडला विहिरीत

Published on -

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :-  राहाता तालुक्यातील कोर्‍हाळे येथील तीन दिवसांपूर्वी बेपत्ता असलेल्या 17 वर्षीय बेपत्ता युवकाचा मृतदेह अखेर विहिरीत आढळला आहे. निखिल संजय तासकर असे मयत युवकाचा नाव आहे.

राहाता पोलिसांनी अकस्मात मृत्यू दाखल केला आहे. दरम्यान निखिल गेल्या तीन दिवसापूर्वी कोर्‍हाळे येथील घरातून बेपत्ता होता. याबाबत राहाता पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली होती.

त्याच्या घरच्या व्यक्तींनी त्याचा शोध घेतला होता. तो मिळून आला नाही. अखेर रविवारी तासकर वस्तीपासून काही अंतरावर बबलू हरिभाऊ बनकर यांच्या विहिरीत निखिलचा मृतदेह आढळून आला.

अधिक माहिती अशी, बनकर हे आपल्या शेतातील विहिरीकडे जनावरांना पाणी पिण्यासाठी विहिरीकडे घेऊन गेले होते. त्यांनी विहिरीत डोकावून बघितले असता

निखिलचा मृतदेह विहिरीत दिसून आला. त्यावरून त्यांनी राहाता पोलिसांना याबाबतची खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन आकास्मात मृत्यूची नोंद केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe