अहमदनगर शहरात गोळीबाराची घटना ! गोळी डोक्यात घुसली…

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहरातील छत्रपती संभाजी नगर महामार्गावर गजराज नगर शेजारील एका पेट्रोल पंपाजवळ गोळीबाराची घटना घडली असून यामध्ये एक जण जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

छत्रपती संभाजीनगर रोडवरील एका पेट्रोल पंपाच्या शेजारी गोळीबारीचा प्रकार घडला असून यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असल्याची प्राथमिक माहिती समजली आहे. ही गोळी डोक्यात घुसली असल्याची प्राथमिक माहिती प्रत्यक्ष साक्षीदारांनी दिलीय.

पोलिसांना ही माहिती कळताच तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली तर जखमी झालेल्या इसमास एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

मात्र ही गोळीबारची घटना कोणत्या कारणातून झाली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नसून पोलीस तपास सुरू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe