सोयाबीन मालाची गाडी लुटणाऱ्या दोघांना श्रीरामपूर पोलिसांकडून अटक; सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :-  श्रीरामपूर शहर पोलिसांनी सोयाबीनची पिकअप गाडी व रक्कम लुटल्याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. या दोघांकडून करून त्यांच्याकडून सव्वा लाख रुपये किमतीचे 22 क्विंटल सोयाबीन जप्त केले.

आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, डोगर शेवली (ता. चिखली जि. बुलढाणा) येथील पिकअप ड्रायव्हर विनोद डिगंबर साबळे यांना चार अनोळखी इसमांनी 2 मोटार सायकलवर येऊन साबळे यांचा पाठलाग केला.

त्यातील पाहिल्या मोटारसायकलवरील दोघांनी बळजबरीने साबळे यांची सोयाबीनची लोड असलेली गाडी घेऊन नेवाशाच्या दिशेने घेऊन गेले तर दुसर्‍या दोघांनी साबळेंकडील रोख रक्कम 3500 रुपये बळजबरीने काढून घेतले.

साबळे व त्याचे साथीदारांना रेल्वे ओवर ब्रीजजवळील शेती महामंडाळाच्या मोकळ्या जागेत काटेरी झुडूपाजवळ एकाच ठिकाणी बराच वेळ थांबवून ठेवले व नंतर साबळे व त्याचे मित्रांंना पिकअप गाडीजवळ सोडल. पिकअपमधील सोयाबीनचा 30 क्विटंल माल बळजबरीने खाली करून चोरून नेला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

यावरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दीपक उर्फ डॅनी दिलीप बारसे (वय 33, रा. नांदुर, ता. राहाता) व मनोज लक्ष्मण सोडणार (वय 22 रा. नांदूर, ता. राहाता) यांना दि. 20 नोव्हेंबर 2021 रोजी अटक केली.

तर तपासादरम्यान त्यांनी गणेश शांताराम जाधव (रा. नांदूर, ता. राहाता) संदीप पारखे (रा. ममदापूर, ता. राहाता) व विवेक लक्ष्मण शिंदे (वय 25, रा. टाकळीभान ता. श्रीरामपूर) या साथीदारांची नावे सांगितली.

यातील आरोपी विवेक लक्ष्मण शिंदे याला श्रीरामपूर तालुका पोलिसांनी यापुर्वीच अटक केली असून तो न्यायालयीन कोठडीत आहे. आरोपींकडून सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त करणयात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe