आपल्याला मूल हवे असल्याने तू ‘या’ मित्राशी संबंध ठेव

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :- एका पतीनेच पत्नीवर बलात्कार करण्यासाठी मित्राना परवानगी दिली. मित्राच्या मदतीने पत्नीवर अत्याचार घडवून आणल्याचा गुन्हा पतीने केला आहे.

मूल होत नाही, म्हणून पत्नीला जबदस्तीने आपल्या मित्रासोबत संबंध ठेवण्यास भाग पाडणारा पती आणि त्याच्या मित्रालाही पोलिसांनी अटक केली. हा धक्कादायक प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात घडला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, कल्याण येथील एका २२ वर्षीय युवतीचे पाथर्डी तालुक्यातील एका गावामधील युवकाबरोबर २०२० साली विवाह झाला होता. यानंतर काही कालावधी हा नव-याच्या कुटुंबियांसोबत ती युवती सासरी राहात होती. याच कालावधीत वाद झाल्याने युवती ही माहेरी निघून गेली होती.

काही दिवसांनी पीडितेचा पती आला पत्नीची समजूत काढून तिला नांदायला घेऊन गेला. सासरी राहत असताना दि. २२ सप्टेंबरला रात्री युवती ही पतीसोबत त्याच्या एका मित्रासह घरी गेले. घरामध्ये जाताच पतीने त्याच्या मित्राने त्या युवतीच्या रूममध्ये जाऊन आतून दरवाजा बंद केला.

“आपल्याला मूल हवे असल्याने तू या मित्राशी संबंध ठेव”, असे पीडितेच्या पतीने सांगितले असता तिने नकार दिला. यावेळी तिला गुंगीच्या गोळ्या देऊन तिच्यावर पतीच्या मित्राने अत्याचार केला. यानंतर नवऱ्यानेही अत्याचार केले. या घडामोडीनंतर पीडितेला धमकावत म्हणाला, मूल हवे असेल तर मित्राशी संबंध ठेवावेच लागतील.

यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा नवरोबाचा मित्र घरी आला. त्या दोघांनीही पुन्हा त्या युवतीवर अत्याचार केला. परंतु दुसऱ्या दिवशी पीडितेने माहेरी संपर्क साधला.

ही माहिती समजताच, पीडितेच्या नातेवाईकांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात पीडितेच्या पती व त्याच्या मिञाविरुद्ध तक्रार दिली. पाथर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोघांनाही अटक केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe