अहमदनगर Live24 टीम, 12 ऑक्टोबर 2021 :- संगमनेर शहरातील कत्तलखाने हा विषय गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत होता. यामुद्यावरून वातावरण तापलेले पाहिजे असता काही कारवाई देखील करण्यात आल्या मात्र आता पुन्हा एकदा काही प्रलंबित मुद्द्यांसाठी संगमनेरात आंदोलन केले जाणार आहे.
शहरातील बेकायदेशीर कत्तलखान्याला जबाबदार असणार्या पोलीस अधिकार्यांवर सात दिवसात निलंबनाची कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन देऊनही अधिकार्यांविरुद्ध कारवाई न झाल्याने शहरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
या मागणीसाठी आज या संघटना प्रांताधिकारी कार्यालयासमोर पुन्हा ठिय्या आंदोलन करणार आहे. काही दिवसांपूर्वीच शहरातील पाच कत्तलखाने जमीनदोस्त करण्यात आले होते तर अजून सहा कत्तलखाने बाकी आहेत.दरम्यान संगमनेर शहरात 11 व तालुक्यात त्यापेक्षाही अधिक बेकायदेशीर कत्तलखाने अस्तित्वात आहेत.
हे सर्वच कत्तलखाने उद्ध्वस्त करायचे आहेत. अशी मागणी संघटनेन केली आहे. संगमनेरातील बेकादेशीर कत्तलखाने संदर्भात भिवंडी येथील प्राणी कल्याण अधिकारी यतीन जैन यांनी पुढाकार घेऊन विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती.
यानंतर नाशिक व अहमदनगर येथील पोलिस पथकाने संगमनेर येथल कत्तलखान्यावर छापा टाकला होता. त्यांनतर हिंदुत्वादी संघटनांनी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन केले.
शहरातील सर्व कत्तलखाने उद्ध्वस्त करावेत, यातील सराईत गुन्हेगारांना हद्दपार करावेत, जबाबदार असणार्या पोलीस अधिकार्यांविरुद्ध निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.
संबंधित अधिकार्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते. मात्र विहित कालावधी संपूनही त्या अधिकार्यांविरुद्ध कारवाई न झाल्याने संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाल्या आहे. यामुळे आज या संघटना प्रांताधिकारी कार्यालयासमोर पुन्हा ठिय्या आंदोलन करणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम