Ahmednagar News : पारनेरमधील सोळा गावांना ‘मुळा’तून होणार पाणीपुरवठा, पालकमंत्री विखेंकडून प्रस्तावाबाबत सूचना

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील कान्हूर पठारसह १६ गावच्या योजनेचा मुख्य जलस्रोत मांडओहळ ऐवजी मुळा धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रातून करण्याचा मार्ग आता खुला झालाय.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना तशा पद्धतीचा प्रस्ताव करण्याच्या सूचना गुरुवारी (दि.२२) दिल्या असल्याची माहिती महाराष्ट्र भाजपाच्या प्रदेश कार्यकारणीचे सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी दिली.

 कान्हूर पठारसह सोळा गाव योजनेच्या निर्मितीसाठी व दुरुस्तीसाठी शासनाने आजवर कोट्यावधी रुपये खर्च केले. या गावांना जे पाणी येते त्या पाणी योजनेचा मुख्य जलस्रोत असलेल्या मांडओहळ धरणातच एप्रिल, मे व जून महिन्यांत पाणी शिल्लक राहत नसते.

त्यामुळे या योजनेच्या लाभक्षेत्रातील गावांना ऐन उन्हाळ्यात पाणी उपलब्ध होत नाही व याच कालावधीत पाण्याची आवश्यकता असते.

परिणामी ही योजना असून नसल्यासारखीच आहे. स्थानिक नागरिकांनी ही स्थिती खासदार डॉ.सुजय विखे यांच्या निदर्शनास आणून दिली. ते २० फेब्रुवारी २०२४ रोजी पारनेर तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता या भागातील शेतकऱ्यांच्या वतीने सबंधित मागणी करण्यात आली.

आता याबाबत खासदार सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली सबंधित पाठपुरावा सुरु असल्याची माहिती कोरडे यांनी दिली.

 पारनेर तालुक्याचा पठार भाग हा सातत्याने दुष्काळाच्या झळा सोसत आलेला आहे. एप्रिल ते जून महिन्यांत या भागातील प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य तर असतेच पण ही बाब मात्र नित्याची आहे.

या भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कोट्यावधी रुपयांची योजना केली गेली. परंतु अद्यापही येथे सातत्याने टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतो.

ही बाब निदर्शनास आल्याने केवळ सबंधित योजनेचा जलस्रोत अभ्यासपूर्वक निवडला नसल्याने नागरिकांना वर्षानुवर्षे पिण्यासाठीच्या पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याचे कोरडे यांनी खासदार व पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

ही सर्व परिस्थिती पाहता यावर कायमस्वरूपीचा उपाय करावा. यासाठी मुळा धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रातून सबंधित योजनेचा जलस्रोत निर्माण करण्याबाबत विचहर झाल्यास पारनेरच्या पठार भागाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी निकाली निघेल असे पत्राद्वारे सुचविले होते.

आता कान्हूर पठारसह १६ गावच्या योजनेचा मुख्य जलस्रोत मांडओहळ ऐवजी मुळा धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रातून करण्याचा मार्ग खुला झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe