आतापर्यंत जिल्ह्यातील ‘इतक्या’ नागरिकांनी घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस …?

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असून सर्व गावात १०० टक्के लसीकरण करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे .

आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे २७ लाख ४४ हजार ३२४ नागरिकांनी कोरेाना प्रतिबंधक लस घेतली आहे. यातील २० लाख ३७ हजार ८०६ जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर ७ लाख ६ हजार ५१८ जणांनी दुसरा डोस घेतल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे यांनी दिली.

दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेत आयोजित केलेल्या एका बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्ह्यात सध्या अनेक भागात जोरदार पाऊस पडत आहे.त्यामुळे अनेक भागात साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे.

त्यातच कोरेानाचा देखील प्रादुर्भाव वाढत असून या पार्श्वभूमीवर त्या – त्या भागात साथरोगाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा. अशा सुचना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके पाटील यांनी अधिकाऱ्यांना केल्या. दरम्यान सध्या अनेक ठिकाणी कोरोनासोबत साथिचे आजार देखील मोठ्या प्रमाणात फेैलावत असून अनेक नागरिक या साथीच्या आजाराने त्रस्त झालेले आहेत.

त्याअनुषंगाने या आजाराबाबत आढावा घेवून प्रतिबंधात्मक उपाय करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. अलीकडेच जिल्ह्यात डेंग्यूचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत असून या पार्श्वभूमीवर नागरिकांनी डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा तसेच आरोग्य विभागाने याबाबत सर्व उपाययोजना प्रभावीपणे राबव्यात अशा सुचना केल्या.

जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असून सर्व गावात १०० टक्के लसीकरण करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन देखील त्यांनी केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe