२२ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याचा कार्यक्रम सुरू आहे.सोसायटीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवारी शेवटच्या दिवसाअखेर संचालकांच्या २१ जागांसाठी २४२ उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत.आज शेवटच्या दिवशी ३३ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.दरम्यान,दाखल अर्जाची छाननी होऊन २५ तारखेला वैध नामनिर्देशन पत्रांची (अर्जाची) यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
माध्यमिक शिक्षक सोसायटीसाठी २३ मार्चला मतदान होणार आहे.तत्पूर्वी १४ फेब्रुवारी पासून उमेदवारी दाखल करण्यास सुरूवात झाली आहे.सोसायटीच्या विविध मतदार संघातून आता पर्यंत २४२ उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत.यात सर्वात उमेदवारी अर्ज हे सर्व साधारण मतदार संघातून १६२ दाखल आहेत.

यंदा माध्यमिक शिक्षक सोसायटीसाठी विक्रमी अर्ज दाखल होण्याची शक्यता माध्यमिक शिक्षकांमधून व्यक्त होत होती. जिल्ह्यात १० हजारांहून अधिक माध्यमिक शिक्षक असले तरी सोसायटीचे सभासद ९ हजार १५२ असून तेच मतदानाला पात्र आहेत. जिल्हा निबंधक गणेश पुरी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक प्रक्रिया सुरू असून आता पर्यंत वेगवेगळ्या मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
असे आहेत दाखल अर्ज
सर्वसाधारण प्रवर्ग १६२, अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघ २१, महिला राखीव २२, ओबीसी राखीव २१ आणि भटके विमुक्त १६ असे २४२ उमेदवारी गुरूवार अखेर दाखल झालेले आहेत.