जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे सक्षमीकरणासाठी इतक्या कोटींची मदत केली जाणार

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :-  नगर जिल्ह्यासह राज्यातील अल्पमुदत सहकारी पतसंरचनेअंतर्गत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे सक्षमीकरणासाठी 2021-22 या आर्थिक वर्षासाठी 130 कोटींचे विशेष अर्थसहाय्य देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे.

यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना 78 कोटींची मदत केली जाणार आहे.

राज्यात राज्य सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व गाव पातळीवर प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकर्‍यांना पीक कर्ज पुरवठा केला जातो.

या कर्जाच्या व्याजापोटी मिळणार्‍या रकमेतून जिल्हा बँका तसेच सेवा सोयायट्यांमधील कर्मचार्‍यांचे पगार निघत असत. मात्र सरकारच्या धोरणामुळे तसेच वारंवार घेतल्या जाणार्‍या व्याजमाफीच्या निर्णयामुळे कृषी पतपुरवठा संस्थांचे आर्थिक गणित पूर्ण कोलमडून पडले.

त्यामुळे जिल्हा बँका आणि पत पुरवठा संस्थांना मदत करण्यासाठी हे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. यासाठी शासनामार्फत 130 कोटी रुपये एवढे वाढीव अर्थसहाय्य बँकांना देण्यात येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe