अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव येथील ग्रामविकास अधिकारी मनोज गुरव यांना कार्यालयात हजर राहण्याची सूचना देऊनही ग्रामविकास अधिकारी गुरव कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे स्वतःबरोबर नेऊन गायब झाले.
हा प्रकार पाहून सरपंच सरपंच महानंदा मांडे यांनी ग्रामपंचायतीचे कार्यालयच सीलबंद केले. तसेच मांडे याची याप्रकरणाची गटविकास अधिकारी गोरख शेलार यांच्याकडे तक्रार केली आहे.
तसेच या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, गावठाण शेजारील अतिक्रमित पाणंद रस्त्याच्या स्थळ पाहणीसाठी श्रीगोंदा भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी शुक्रवारी आले होते.
संवेदनशील रस्ता असल्याने ग्रामपंचायतीने पोलिस बंदोबस्त मागवला होता. परंतु अचानक ग्रामविकास अधिकारी गैरहजर राहिल्याने सरपंच व लिपिक शुभम वाबळे यांनी तपासणी केली असता ग्रामविकास अधिकारी गुरव यांनी स्वतःबरोबर महत्वाची कागदपत्रे घेऊन गेले.
सरपंच मांडे व सदस्य यांनी गुरव यांना फोन केला असता घरगुती कार्यक्रमाचे निमित्त सांगितले. सरपंचांनी रजेचा अर्ज नसल्याचे सांगितल्यावर गुरव यांनी शुक्रवारी सकाळी रजेचा अर्ज पंचायत समितीच्या टपालात दिल्याचे सांगितले.
या प्रकारामुळे सरपंच मांडे यांनी इतर पदाधिकाऱ्यांसह गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार करून ग्रामपंचायत कार्यालयातील कपाट व कार्यालय पंचनामा करून सील केले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम