…म्हणून बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना ठोठावला 10 हजारांचा दंड

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- सार्वजनिक बांधकाम उपविभाग कोपरगाव शाखा अभियंता डी. बी. गाडे यांना दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. माहिती अधिकारात मागीतलेली माहिती वेळेत न दिल्यामुळे हि कारवाई करण्यात आली आहे.

दंडाची शास्ती राज्य माहिती नाशिक खंडपीठ आयुक्त के. एल. बिश्नोई यांनी सुनावली. तर तत्कालीन उप अभियंता कोकणे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश पारित केल्याने कोपरगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, माहिती अधिकार कार्यकर्ते रमेश भोंगळ यांनी सार्वजनिक बांधकाम उप विभाग कोपरगाव यांचेकडे माहिती अधिकार नुसार माहेगाव कुभांरी बजेट निधी अंतर्गत झालेल्या कामाचे मोजमाप पुस्तकातील नोदिंच्या नकलेची मागणी 31 जुलै 2017 मध्ये केली होती.

मात्र विहित मुदतीत माहिती न दिल्याने अभियंता डी. बी. गाढे यांना दहा हजार रुपये दंड त्यांच्या मासिक वेतनातून दोन हप्त्यांत कपात करावा तर कोकणे यांनी अपिल सुनावणी न घेतल्याने त्याचेवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश माहिती आयुक्त के. एल. बिश्नोई यांनी बजावले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe