अरे देवा : म्हणून सुनेने चक्क सासुच्या डोक्यात घातला तांब्या…!

Ahmednagar News:घरो घरी मातीच्या चुली’ अशी मराठीत एक म्हण आहे. म्हणजे प्रत्येक घरात लहान मोठे वाद विवाद हे सुरू असतात.

आणि त्यातल्या त्यात सासू सुनेचे वाद नेहमीच दिसतात. मात्र नगर शहरात किरकोळ वादातून सुनेने चक्क सासुला तांब्याने डोक्यात मारहाण केल्याची घटना स्टेशन रोड परिसरात घडली आहे.

याप्रकरणी सासूने दिलेल्या फिर्यादीवरून सून वनिता अशोक जंगमविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छबुबाई लक्ष्मण जंगम असे या सासूचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, सकाळी सासू छबुबाई घराच्या बाहेर बसलेल्या असताना सुन वनिता हिने घरातील गोष्टी बाहेर का सांगता असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.

त्यावर तुला काय करायचे असे छबुबाई म्हणाल्याचा राग आल्याने वनिता हिने घरातील तांब्या आणत त्याने त्यांच्या डोक्यात मारले व धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.