अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- गेल्या काही महिन्यांपासून बळीराजामागील संकटे काही केल्या संपत नसल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात तयार झाले आहे. निसर्गाची वक्रदृष्टी यामुळे देखील बळीराजा त्रासला आहे.
यातच अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे हाता तोंडाशी आलेला घास हिरावून चालला असल्याचे दिसून येत आहे. यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.

अशा परिस्थितीत संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी गावा अंतर्गत असलेल्या आनंदवाडीतील शेतकऱ्याने वैतागून तब्बल दोन एकर क्षेत्रावरील लाल कांदा पिकात मेंढ्या सोडल्या आहेत.
वातावरणातील बदलांचा सिलसिला कायमच राहिल्याने जवळपास एक लाख रुपये खर्च केलेल्या कांदा पिकावर प्रतिकूल परिणाम झाला.
यातून हाती काहीच शिल्लक राहणार नसल्याने बळीराजाच्या लक्षात आल्याने अखेर वैतागून किमान मुक्या जीवांना तरी चारा होईल म्हणून मुरलीधर सरोदे यांनी दोन एकर कांद्याच्या पिकामध्ये मेंढ्या सोडून दिल्या आहेत.
एकामागून संकटांनी शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडले असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे. दरम्यान आजही जिल्ह्यातील अनेक ठिकाणी झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक नुकसान भरपाई मिळाली नाही आहे. यामुळे बळीराजा कंटाळून आत्महत्येसारखा टोकाचे पाऊले उचलत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम