अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- गेल्या काही दिवसांपासून नगरकरांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे अनेक लोकांना दूषित पाणी पिण्यामुळे आजाराला सामोरे जावे लागत आहे.
येत्या 2 दिवसांत दूषित पाणीपुरवठा बंद न झाल्यास त्याच पाण्याने महापालिका आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांना आंघोळ घालू, असा इशारा मनसेचे नितीन भुतारे यांनी दिला आहे.

दरम्यान गेल्या 15 दिबासांपासून शहरातील अनेक भागांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी करूनही मनपा अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही.
महापौर, आमदार तसेच नगरसेवकही या नागरी समस्यांकडे लक्ष देत नाहीत. त्यांना जनतेच्या आरोग्याचे काही देणेघेण नाही, असा आरोप भुतारे यांनी केला आहे.
याप्रश्नानी भुतारे यांनी अभियंता रोहिदास सातपुते यांच्यांशी तसेच सहाय्यक अभियंता राहुल गीते यांच्याशी संपर्क करून स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची मागणी केली.
मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. दरम्यान तातडीने हि समस्या न सुटल्यास येणाऱ्या काळात मनसेच्या माध्यमातून संबंधित नागरिक महानगरपालिकेच्या दालनात आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम