Ahmednagar News: नेहमीच दारुच्या नशेत त्याच्या घरच्या लोकांना शिवीगाळ करुन मारहाणीच्या सततच्या त्रासाला कंटाळुन लहान भावाने त्याच्या मोठ्या भावाच्या डोक्यात कुऱ्हाडीने डोक्यात घाव घालुन जिवे ठार मारले. ही घटना राहुरी तालुक्यातील पिंपळगाव फूणगी येथे घडली.
या घटनेत राहुल अरुण लोखंडे याचा मृत्यू झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, मयत राहुल अरुण लोखंडे हा नेहमीच दारुच्या नशेत त्याच्या घरच्या लोकांना शिवीगाळ करुन मारहाण करत असे.
त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळुन त्यास भाऊ अमोल याने कुऱ्हाडीने डोक्यात घाव घालुन जिवे ठार मारले. याप्रकरणी पोलीस पाटील फुणगे यांच्या फिर्यादीवरुन राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.