Ahmednagar News:जावयाने पैसे न दिल्याने त्याला शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.
रविवारी रात्री भोसले आखाडा परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी जावई पंकज समाधान घाटे (वय ३२, रा. बुरूडगाव रोड)

यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून त्यांची सासू मिना संजय साळवे (रा. बुरूडगाव रोड) व ज्ञानेश्वर जठाळे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. नेवासा) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.













