आषाढी वारीनिमित्त राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी त्यामुळे भाविकांच्या जातात. सोईसाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या आहे. दौंड रेल्वे मार्गावर नागपूर – मिरज-नागपूर अमरावती – पंढरपूर, , खामगाव- पंढरपूर व भुसावळ- पंढरपूर या विशेष गाड्या सोडणार
असून थांब्यामध्ये देखील विस्तार केल्याची माहिती राज्य प्रवासी महासंघाचे अध्यक्ष रणजीत श्रीगोड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे श्रीगोड यांनी पत्रकात दिली. म्हटले, की पंढरपूरसाठी जाणाऱ्या रेल्वेगाड्या पुढीलप्रमाणे- नागपूर मिरज ही नागपूर येथून रविवारी ( दि.१४) सकाळी ८.५० वाजेला सुटेल मिरज स्थानकावर सोमवारी ( सकाळी ११.५५ वाजता आणि दि.१५) पोहोचेल.
मिरज- नागपूर ही गुरूवारी दि. १८ रोजी मिरज येथून दुपारी १२.५५ वाजता सुटेल आणि नागपूर स्थानकावर शुक्रवारी (दि. १९) दुपारी १२.२५ वाजता पोहोचेल. नागपूर- मिरज गाडी (दि.१५) सकाळी ८.५० वाजेला सुटेल आणि मिरज स्थानकावर मंगळवारी (दि. १६) सकाळी ११.५५ वाजता पोहोचेल. मिरज- नागपूर गाडी मिरज येथून शुक्रवारी (दि.१९) दुपारी १२.५५ वाजता सुटेल आणि नागपूर स्थानकावर शनिवारी (दि.२०) दुपारी १२.२५ वाजता पोहोचेल.
अमरावती – पंढरपूर गाडी न्यू अमरावती येथून शनिवारी (दि.१३) आणि मंगळवारी (दि.१६) दुपारी २.४० वाजता सुटेल आणि पंढरपूर स्थानकावर रविवारी (दि.१४) आणि बुधवारी (दि. १७) सकाळी ९.१० वाजता पोहोचेल. पंढरपूर- न्यू अमरावती विशेष गाडी रविवारी (दि.१४) दि.१८) शुक्रवारी (दि.१९) दुपारी १२.५५ आणि बुधवारी (दि.१७) पंढरपूर येथून संध्याकाळी ७.३० वाजता सुटेल आणि न्यू अमरावती येथे सोमवारी (दि.१५) आणि गुरूवारी (दि.१८) दुपारी १२.४० वाजता पोहोचेल.
खामगाव- पंढरपूर गाडी खामगाव येथून रविवारी (दि.१४) आणि बुधवारी (दि.१७) सकाळी ११.३० वाजेला सुटेल आणि पंढरपूर स्थानकावर सोमवारी (दि.१५) आणि गुरूवारी (दि.१८) मध्यरात्री ३.३० वाजता पोहोचेल. पंढरपूर- खामगाव विशेष गाडी पंढरपूर येथून सोमवारी (दि.१५) आणि गुरुवारी (दि. १८) पहाटे ५ वाजता सुटेल आणि खामगाव स्थानकावर त्याच दिवशी संध्याकाळी ७.३० वाजता पोहोचेल.
भुसावळ- पंढरपूर विशेष रेल्वेगाडी भुसावळ येथून मंगळवारी (दि.१६) दुपारी १.३० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे बुधवारी (दि.१७) मध्यरात्री ३.३० वाजता पोहोचेल. पंढरपूर भुसावळ ही पंढरपूर येथून बुधवारी (दि.१७) रात्री १०.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजता भुसावळ येथे पोहोचेल.
लातूर- पंढरपूर- लातूर व मिरज पंढरपूर- मिरज या रेल्वेमार्गांवरदेखील विशेष रेल्वेगाड्या धावणार आहेत. पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांनी या सर्व विशेष रेल्वे गाड्यांचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
या रेल्वे स्थानकांवर विशेष गाड्यांना थांबे
नागपूर- मिरज गाडीला अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मुर्तीजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुडूवाडी, पंढरपूर, सांगोला, म्हसोबा डोंगरगाव, जत रोड, ढालगाव, कवठेमहांकाळ, सलगरे, आरग, मिरज या ठिकाणी थांबा दिलेला आहे.
तसेच न्यू अमरावती – पंढरपूर रेल्वेला बडनेरा, मुर्तीजापूर, अकोला, शेगाव, जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुडूवाडी, पंढरपूर येथे थांबे दिलेले आहेत.
खामगाव – पंढरपूर रेल्वेला जलंब, नांदूरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुडूवाडी आणि पंढरपूर असे थांबे आहे. तर भुसावळ- पंढरपूर विशेष रेल्वेगाडीला जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, अंकाई, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुडूवाडी असे थांबे आहेत.