Share Market Scam : श्रीगोंदेकरांना झटपट श्रीमंत होण्याचा हव्यास नडला ! कोट्यवधी रुपयांची फसवणूक

Ahmednagarlive24 office
Updated:

Share Market Scam : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली शहरी भागातील नागरिकांना शेकडो कोटींचा गंडा घातल्याचे अनेक प्रकरणे गाजत असतानाच या फसवणुकीचे लोन आता ग्रामीण भागात देखील पोहोचले आहे.

शेअर बाजारातील नफ्याचे आमिष दाखवत श्रीगोंदा तालुक्यातील एकाने अनेक जणांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. शेअरमार्केटमधून झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली असल्याची चर्चा श्रीगोंदा परिसरात होत आहे.

श्रीगोंदा तालुक्याच्या पूर्व भागातील एकाने तालुक्यातील तसेच परिसरातील अनेक सधन लोकांना शेअर बाजारातील गुंतवणुकीतून मिळणाऱ्या नफ्याने झटपट श्रीमंत श्रीमंत होण्याचे आमिष दाखवत शेअर बाजारात गुंतवणुक करण्यास भाग पाडले.

त्यांच्याकडून मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी लाखो रुपये गोळा केले. मार्केटमधून मिळणाऱ्या नफ्याच्या परताव्यापोटी लोकांना ठराविक मुदतीचा आणि रकमेचा धनादेश दिला.

घेतलेली रक्कम शेअर बाजारात गुंतवणूक करत मिळालेल्या नफ्याची रक्कम लोकांना माघारी देण्यासाठी दिलेले धनादेश बँकेत न वटल्याने गुंतवणूकदारांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

यातील काही जणांनी या ठगाला न्यायालयात देखील खेचण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. शेअरमार्केटमधून झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली असल्याची चर्चा श्रीगोंदा परिसरात होत आहे.

आर्थिक प्रकरणात नागरिकांनी मृगजळाच्या मागे जाऊ नये, कमी कालावधीत श्रीमंत होण्याचा मार्गात मोठे नुकसान होवू शकते. अश्या प्रकारे आर्थिक प्रकरणात फसवणूक झालेल्या नागरिकांनी पोलिसांशी संपर्क करावा. चौकशी करून फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करू – ज्ञानेश्वर भोसले, पोलिस निरीक्षक श्रीगोंदा

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe