अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :- एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरु केले आहे.
दरम्यान नगर जिल्ह्यात या आंदोलनात सहभागी झालेल्या सुमारे २६२ कर्मचाऱ्यांचे निलंबन आजअखेरपर्यंत करण्यात आले. निलंबनानंतरही कामावर हजर होण्यास अनेक जण अद्यापि तयार नाहीत.
विलगीकरणाची मागणी मान्य करा, यावर सर्व जण हटून बसले आहेत.यामुळे हा संप अद्यापही सुरूच आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत.
विलगीकरण कक्षासह इतर काही मागण्या मान्य न झाल्याने कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे एसटीची पूर्ण सेवा ठप्प झाली आहे.
त्यामुळे सध्या खासगी वाहतूक जोमात सुरू आहे. त्यांच्याकडून प्रवाशांची लूट होत आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी व राज्य सरकार या दोन्हींबाबत सर्वसामान्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
राज्य सरकारने सर्व कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे, असे आवाहन अनेकदा केले आहे. मात्र, कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यामुळे हा तिढा वाढत गेलेला आहे.
कामावर एसटी कर्मचारी हजर होत नसल्याने एसटी प्रशासनाने काहींचे निलंबन केले आहे. यामध्ये अहमदनगर विभागामध्ये एकूण २६२ जणांचे निलंबन झाले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम