राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील उद्या नगर दौऱ्यावर

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील बुधवारी नगरच्या दौर्‍यावर येत असून, राष्ट्रवादी परिवार संवादच्या माध्यमातून ते ग्रामीण आणि शहर संघटनेच बैठक घेणार आहेत.

असा असणार आहे पाटील यांचा दौरा… बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता जलसंपदा अधिकार्‍यांसमवेत प्रथम बैठक होणार आहे. त्यानंतर ग्रामीण भागातील राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांसमवेत ते संवाद साधणार आहेत.

त्यानंतर नगर शहर जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. यानंतर ते सुपे येथे जाऊन आ. नीलेश लंके यांच्या उपस्थितीत पारनेर तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

तसेच श्रीगोंदा मतदारसंघाचा आढावा घेऊन तेथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. ‘राष्ट्रवादी परिवार संवाद’ दौर्‍याच्या निमित्ताने होणार्‍या या सर्व बैठका राष्ट्रवादी भवन येथे होणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News