अहमदनगर Live24 टीम, 13 ऑक्टोबर 2021 :- गुलाबी चक्रीवादळ येण्यापूर्वी जिल्ह्यात 163 गावातील 36 हजार 46 शेतकर्यांना मुसळधार आणि अतिवृष्टीचा फटका बसला होता.
यात 21 हजार 268 हेक्टरवरील जिरात पिकांना, 2 हजार 451 हेक्टरवरील बागायत पिकांना तर 208 हेक्टर फळबागांचा समावेश होता.बळीराजा पावसाने मोठ्या प्रमाणात उध्दवस्त झालेला असून शासन अद्याप माहिती घेत आहे. कोणत्याही शेतकर्यांना अद्याप शासनाकडून भरपाई मिळाले नाही आहे.

जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या मुसळधार, अतिवृष्टी आणि चक्री वादळाचा चांगलाच दणका जिल्ह्यातील शेती आणि शेतकर्यांसोबत नागरिकांना बसला आहे. यात 53 हजार 115 हेक्टरवरील शेती बाधीत झाली असून 61 हजार 635 शेतकर्यांचे नुकसान झाले आहे.
तर मुसळधार पावसामुळे 1 हजार 36 घरांची पडझड तर 403 पूशधनाची हानी झालेली आहे. जिल्हा प्रशासनाने या सर्वांचा पंचनामा करून शासनाकडे 22 कोटींच्या भरपाईचा प्रस्ताव पाठवलेला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत 141 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झालेला असून धरणे, नदी, नाले, विहीरी तुडूंभ भरलेल्या असून सध्या उभ्या पिकात पाणी साठलेले आहे. यामुळे शेतकर्यांची अवस्था विचित्र झालेली आहे. जून महिन्यांपासून जिल्ह्यात ही परिस्थिती हळूहळू निर्माण झाली.
जुलै महिन्यांत पावसाने ताण दिल्याने दक्षिण जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिके सुकून गेली. मात्र, त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत जिल्ह्यात पावसाने चांगलाच तडाख दिला आहे. विशेष करून नगर, जामखेड, कोपरगाव, पाथर्डी, शेवगाव या तालुक्यात याचे प्रमाण अधिक आहे
. जिल्ह्यात 53 हजार 115 हेक्टरवरील शेती बाधीत झाली असून 61 हजार 635 शेतकर्यांचे नुकसान झाले असून मुसळधार पावसामुळे 1 हजार 36 घरांची पडझड तर 403 पूशधनाची हानी झालेली आहे.
यासह 1 हजार 807 भांडे व घरगुती वस्तूंचे नुकसान झालेले असून 369 हेक्टरवरील शेती खरडून वाहून गेलेली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने या सर्वांचा पंचनामा करून शासनाकडे 22 कोटींच्या भरपाईचा प्रस्ताव पाठवलेला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम













