अर्सेनिक अल्बमची अजूनही प्रतीक्षाच; ‘त्या’विभागाकडून चालढकल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी अर्सेनिक अल्बम 30 हे औषध प्रभावी असल्याचे आयुष्य मंत्रालयाने सांगितले होते. त्यानंतर अनेक ठिकाणी या गोळ्यांचे वाटपही करण्यात आले.

याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने ग्रामीण भागामध्ये प्रत्येक कुटुंबाला या गोळ्यांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला. मे महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात हा निर्णय घेतला.

परंतु पाच महिने होत आले तरी या गोळ्या लोकांना मिळालेल्या नाहीत. जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाच्या उदासीनतेमुळे ही योजना अद्याप कागदावरच असल्याची चर्चा आहे.

आर्सेनिक अल्बम 30 गोळ्या खरेदी करण्यासाठी तब्बल पाच महिन्यांनी निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. किमान आठ दिवसांनी निविदा उघडून नाव निश्चित केले जाईल, प्रत्यक्षात औषध खरेदी कधी होईल,

नोव्हेंबर महिन्यात तरी लोकांना खरच औषधे मिळतील का, याबाबत एकही अधिकारी ठामपणे माहिती देऊ शकले नाहीत. यामुळे नोव्हेंंबरमध्ये देखील हे औषध मिळेल, याची शाश्वती नसल्याचे चित्र आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment