‘नायलॉन मांजावर बंदीसाठी कठोर कारवाई करावी’

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-पशू-पक्ष्यांसह मनुष्यांच्या जीवावर बेतणाऱ्या नायलॉन (चायना) मांजावर शहरात पूर्णत: बंदी आणण्यासाठी कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन युवा सेनेचे सावेडी विभागप्रमुख महेश शेळके यांनी महापालिकेत दिले.

सणावर चायनाचे विघ्न नको असल्याचे स्पष्ट करून, त्यांनी युवकांमध्ये जनजागृती करण्याचे स्पष्ट केले. मकरसंक्रांतीनिमित्त शहरात मोठ्या प्रमाणात पतंग उडवण्यात येतात.

पतंग कापली जाऊ नये यासाठी युवक नायलॉन (चायना) मांजाचा वापर करीत आहे. हा मांजा सहजासहजी तुटत नसल्याने, अनेक पशू-पक्ष्यांना इजा होत आहे.

या मांजाने अनेक व्यक्तींचा गळा, हात कापले जाण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. यामध्ये अनेकांना अपंगत्व आले आहे, तर काही मृत्युमुखी देखील पडले आहेत. अंध व्यक्तींनाही याचा मोठा धोका निर्माण झालेला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.