Ahmednagar News : श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथील कर्मचाऱ्यांचा संप स्थगित करण्यात आला आहे. कर्मचारी, विश्वस्त व सीटू युनियनचे पदाधिकारी यांच्यात काल नाशिक येथे बैठक झाली.
यात ४ जानेवारी २४ रोजी सकारात्मक निर्णय होणार असल्याने संप मागे घेण्याचा निर्णय डॉ. डी. एल. कराड देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष व कामगार युनियनचे अध्यक्ष यांच्या संयुक्त विचाराने झाला असल्याची माहिती मिळाली आहे.

Ahmednagar News
सोमवारी नाशिक येथे सिटू युनियनचे राज्य अध्यक्ष डॉ. कराड, देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर व विश्वस्त मंडळ तसेच देवस्थान कामगार युनियनचे अध्यक्ष व संचालक मंडळ यांच्यात सर्व मागण्यांची चर्चा झाली.
यावर ४ जानेवारी रोजी निर्णय होणार असल्याने सर्व कर्मचाऱ्यांनी देवस्थानचे दैर्नादन कामकाज चालू ठेवण्याची विनंती श्री शनैश्वर देवस्थानचे कामगार युनियनचे अध्यक्ष यांनी केली आहे.