Ahmednagar News : इयत्ता दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याने बदनामी होईल, या भीतीने या विद्यार्थिनीने विषारी औषध सेवन करून जीवन यात्रा संपविली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, २९ फेब्रुवारीला इयत्ता दहावीत शिकणारी मुलगी परीक्षेचे रिसीट आणण्यासाठी गेली होती. यावेळी सौरभ खेमनर याने तिला बळजबरी करत एका पान शॉपमध्ये नेले.
या ठिकाणी त्याने मुलीच्या तोंडाला रुमाल बांधून तसेच दोन्ही हात बांधून तिच्यावर अत्याचार केला. यावेळी चार जणांनी त्याला मदत केली. अत्याचारावेळी योगेश खेमनर याने पान शॉपचे शटर बंद करून घेत बाहेरून कुलूप लावले होते.
यावेळी प्रशांत भडांगे व विजय खेमनर यांनी पान शॉपच्या बाहेर थांबून देखरेख करत सौरभ खेमनर याला पीडित मुलीवर अत्याचार करण्यासाठी मदत केली. यावेळी तेथे आलेल्या बाजीनाथ दातीर याला तू येथे का आला, निघून जा अशी दमबाजी केली.
अत्याचारामुळे बदनामी होईल या भीतीने या मुलीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली होती.
याबाबत मुलीच्या नातेवाईकांनी रविवारी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी सौरभ खेमनर, योगेश रामा खेमनर (दोघे रा. हिरेवाडी, साकूर), प्रशांत भास्कर खेमनर (भडांगे वस्ती, साकूर),
विकास रामदास गुंड (गुंड वस्ती, मांडवे बुद्रुक) व विजय खेमनर (हिरेवाडी, साकूर) यांच्या विरुद्ध भा.दं.वि. कलम ३७६ (३), १०९, ३०६, ५०६, ३४ सह बाल लैंगिक अत्याचार संहिता कायदा कलम ८, १२, १७, २१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संतोष खेडकर पुढील तपास करत आहेत.
हे पण वाचा
- अहमदनगर ब्रेकिंग : दोन तरुणांचे अपहरण ! डोक्याला पिस्टल लावून १५ लाख लुटले
- गुन्हेगारी पोलिसांसह नागरिकांच्या डोक्याला ताप ! श्रीगोंद्यात खाकीची दहशत कमी झाल्याचे चित्र
- १५ दिवसांत निर्णय न झाल्यास येत्या लोकसभेला मतदान न करण्याचा निर्णय !