Ahmednagar News : कोपरगाव मतदार संघात रस्ते विकासाचा मोठा अनुशेष असल्यामुळे विकासाला मर्यादा येत होत्या. त्यामुळे रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून रस्ते विकासाला मोठ्या प्रमाणात निधी मिळविण्यात यश आले.
त्यामुळे संपूर्ण मतदार संघात रस्त्याचे जाळे निर्माण झाले आणि विकासाला चालना मिळाल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी रांजणगाव देशमुख येथील एका कार्यक्रमात केले.
याप्रसंगी आ. काळे म्हणाले की, खड्ड्याच्या रस्त्याचा प्रवास करताना झालेला त्रास सहन करणाऱ्या मतदार संघातील नागरिकांची रस्त्याची मोठी अडचण दूर झाल्यामुळे बहुतांश रस्त्याचा प्रवास सुखकर झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक नागरीकांकडून रस्त्याच्या निर्मितीबाबत कौतुकास्पद शब्द बाहेर पडतात.
त्याचे मोठे समाधान मिळत आहे. रस्त्यांच्या जाळ्यामुळे अनेक गावे मुख्य रस्त्याना जोडली जावून विकासाला चालना मिळाली असून यापुढील काळातही आपल्या आशीर्वादाने उर्वरित सर्वच रस्त्यांचा विकास करणार असल्याचे आ. काळे यांनी सांगितले.
तसेच निळवंडे डाव्या कालव्यातून तात्पुरत्या एस्केप मधून गावतळी, पाझर तलाव, बंधारे भरून देण्याच्या सूचना आ. काळे यांनी पाटबंधारे विभागाला दिल्या व निळवंडे डाव्या कालव्याची पाहणी केली.