मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांना यश ! उड्डाणपुलासाठी ३८ कोटी

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :- पुणे महामार्गावरील अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज जवळ हॉटेल स्टेटस समोर निर्माण झालेल्या अपघात प्रवण क्षेत्रच्या ठिकाणी उड्डाणपूल व्हावा,

यासाठी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या विशेष प्रयत्नातून या कामासाठी ३८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित भाऊ थोरात यांनी दिली.

मंत्री थोरात यांनी संगमनेर शहरातील वाहनांची वर्दळ कमी करण्यासाठी तात्कालीन केंद्रीय दळणवळण मंत्री सी. पी. जोशी यांच्याकडे पाठपुरावा करून ९ किलोमीटरचा बिना टोल बायपास मंजूर करून घेतला होता.

त्यानंतर नाशिक- पुणे महामार्गाचे चौपदरीकरण होऊन शहरातील वाहतूक बाहेर मार्गाने वळवली गेली. याच बरोबर घुलेवाडी- सुकेवाडी मार्गे बायपास रस्ता तयार केला.

संगमनेर शहरात नव्याने इंजीनिअरिंग कॉलेज ते संगमनेर बस स्थानक या रस्त्याचे चौपदरीकरण व सुशोभीकरणाचे काम सुरू असून यामुळे संगमनेर शहराच्या वैभवात भर पडणार आहे.

माझे घर सोसायटी लगत असलेल्या हॉटेल स्टेटस समोर (नाशिक जंक्शन) पुणे- नाशिक महामार्गावरून संगमनेरकडे येताना व या महामार्गावर जाताना रस्त्यांच्या गुंतागुंतीमुळे हा भाग अपघात प्रवण क्षेत्र झाला होता.

या ठिकाणी काही अपघात झाल्याने थोरात यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे आपल्या वैयक्तिक संबंधातून विशेष पाठपुरावा करत या उड्डाणपुलाच्या कामाकरता ३८ कोटी रुपये निधी मिळवला आहे.

यामुळे हॉटेल स्टेटस समोर अद्यावत उड्डाणपूल उभा राहणार असून या उड्डाणपुलामुळे नाशिक कडून संगमनेरकडे येणारे नागरिक, संगमनेर कडून नाशिककडे जाणारे नागरिक व पुण्यावरून संगमनेरकडे येणारे नागरिक या सर्वांची सोय होणार आहे.

उड्डाणपुलाला ३८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल मंत्री थोरात यांचे घुलेवाडी ग्रामस्थ, आदर्शनगर, माझे घर सोसायटी, वेल्हाळे, सायखिंडी, चिकणी व मालदाड ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिकांनी आभार मानले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe