केंद्राच्या धरसोड धोरणामुळे साखर कारखान्यांना फटका

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उच्च व मध्यमवर्गीय नागरिकांना साखरेच्या वाढत्या दराचा त्रास होऊ नये, याकरिता केंद्र सरकारने साखर, ऊसाचा रस आणि सिरपपासून तयार होणाऱ्या इथेनॉलवर बंदी घातली आहे.

दरम्यान, इथेनॉल वरील सरकारच्या धरसोड धोरणामुळे मोठी आर्थिक कोंडी होऊन साखर कारखान्यांना मोठा फटका बसला असल्याची माहिती संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी दिली.

काल बुधवारी (दि.१०) येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याच्या गाळप हंगाम सांगता कार्यक्रमात बिपीन कोल्हे बोलत होते. यावेळी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोल्हे कारखाना गाळप सांगता संचालक राजेंद्र कोळपे व स्वाती कोळपे या उभयतांच्या हस्ते सत्यनारायण महापूजाने करण्यात आली.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी ज्येष्ठनेते दत्तात्रय कोल्हे, संचालक विश्वासराव महाले, ज्ञानेश्वर परजणे,

रमेश घोडेराव, सतिष आव्हाड, ज्ञानेश्वर होन, ज्ञानदेव औताडे, संजय औताडे, त्र्यंबकराव सरोदे, निवृत्ती बनकर, बाळासाहेब वक्ते, निलेश देवकर, बापूराव बारहाते, रमेश आभाळे, आप्पासाहेब दवंगे, विलासराव माळी, अरूणराव येवले,

शिवाजीराव वक्ते, फकिरराव बोरनारे, अशोक औताडे, डॉ. गुलाबराव वरकड, साहेबराव रोहोम, शरद थोरात, शिवाजीराव देवकर, अंबादास देवकर, केशव भवर, संजय होन, विजयराव आढाव, सोपानराव पानगव्हाणे, कैलास माळी, अशोक भाकरे, राजेंद्र सोनवणे, रविंद्र पाठक, विलास कुलकर्णी, दिपकराव गायकवाड, संभाजीराव गावंड, मनोहर शिंदे आदी उपस्थित होते.

यावेळी बिपीन कोल्हे पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी व इथेनॉल निर्मितीस चालना देण्याकरिता केंद्र शासनाने यापूर्वीच कारखान्यांना डिस्टीलरी प्रकल्प उभारण्यास भाग पाडले. यातून होणाऱ्या फायद्यातून शेतकन्यांना त्यांच्या उसापोटी जादा दर मिळण्याची अपेक्षा असताना निव्वळ लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उच्च व मध्यमवर्गीय नागरिकांना साखरेच्या वाढत्या दराचा त्रास होऊ नये, याकरिता ही बंदी लादलेली आहे.

केंद्राचा हा निर्णय तुघलकी म्हणावा लागेल, या उद्योगाद्वारे हजारो कोटी रुपयांचे भांडवल उभारले आहे. हे प्रकल्प आता संकटात येतील. सचिव टी. आर. कानवडे यांनी सूत्रसंचलन केले. तर शेवटी आभार कारखान्याचे उपाध्यक्ष मनेश गाडे यांनी मानले.

इथेनॉलवर बंदीचा निर्णय चुकीचा

गतवर्षी महाराष्ट्रात ११० मे टन साखरेचे उत्पादन झाले होते. आजही जवळपास ११० मेट्रीक टन साखरेचे उत्पादन होणार आहे. परंतु साखरेचे उत्पादन घटणार या चुकीच्या बातम्यामुळे साखर सिरपपासून तयार होणाऱ्या इथेनॉलवर बंदी घालण्याचा निर्णय चुकीचा आहे.

परंतु या निर्णयामुळे २१ दिवसात इथेनॉल उचलायचे असते, परंतु आज तीन, चार महिने झाले आहे. आमचे वीस कोटीचे तीस लाख लिटर इथेनॉल शिल्लक पडून आहे. कारखान्याचे आर्थिक चक्र ठप्प झाले असल्याचे बिपीन कोल्हे यांनी स्पष्ट केले.

■साखर इंडस्ट्रीज सिजनल नाही तर बारमाही करण्याचा विचार असून लवकरच ७ ते ८ महिन्यात नवीन प्रकल्प सुरू होत आहे. मधुमेहासाठी शुगर फ्री गोळ्या, त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी मत्स्य शेती, बांबू शेती, बांबू उत्पादने, सीबीजी वर चालणारे पंप, इथेनॉलवर चालणारे पंप, अशी झेप आपण घेत आहोत. बिपीन कोल्हे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe