‘त्या’ तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या,शोकाकूल वातावरणात अत्यसंस्कार !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथील युवराज रामदास नागरे (वय २४) या तरुणाने शुक्रवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलीस पाटील दिलीप सांगळे यांनी आश्वी पोलीसाना खबर दिली.दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर, गुप्तवार्ता विभागाचे विनोद गंभीरे,

शेख,पो. ना. झोडंगे,पो. कॉ. रणधीर आदींनी घटनास्थळी दाखल होत स्थानिकाच्या मदतीने युवराजचा मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी संगमनेर ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे.

या तरुणाने आत्महत्या का केली? त्याचे कारण मात्र स्पष्ट झाले नाही. सायंकाळी उशीरा शोकाकूल वातावरणात अत्यसंस्कार करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment