Ahmednagar News : विषारी औषध घेऊन विवाहित तरुणाची आत्महत्या

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmadnagar Breaking

Ahmednagar News : मढी खुर्द ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या नाशिक रोडलगत गोदावरी उजव्या कालव्याजवळ रहिवासी असलेल्या रवींद्र निवृत्ती गवळी (३५) यांनी अज्ञात कारणावरून विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.

याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे; मात्र या तरुणाने कोणत्या कारणाने ही आत्महत्या केली हे समजू शकले नाही.

या तरुणास कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यानी त्यास मृत घोषित केले आहे. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार गजाजन वांढेकर करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe