दगडाच्या खाणीत तरुणाची आत्महत्या

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : शिर्डी शहरा लगतच्या निमगाव कोऱ्हाळे गावातील अनिकेत रमेश कातोरे (वय २२) या तरुणाने सावळीविहीर लगतच्या के. के. मिल्क समोर असलेल्या दगडाच्या खाणीत उडी घेऊन (दि. १५) ऑगस्ट रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास आत्महत्या केल्याने निमगाव कोऱ्हाळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

सामाजिक कार्यकर्ते रमेश कातोरे यांचा तो मुलगा आहे. सुंदर घटनेची माहिती मिळताच निमगाव कोहळे ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवुन त्यास बाहेर काढले असता तो मृत झाल्याने त्यास राहाता येथे शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले अतिशय शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हुशार मनमिळाऊ व मोठा जनसंपर्क असलेल्या अनिकेत कातोरे यांने इतके टोकाचे पाऊल का उचलले असावे, असा प्रश्न विचारला जात असून तो इतक्या रात्री सावळीविहीर येथील दगडाच्य खाणी जवळ का गेला त्याच्या बरोबर आणखी कोणी होते, का असे काय घडले की, त्याने इतक्य टोकाचे पाऊल उचलले, असा प्रश्न उपस्थित होत असून शिर्डी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

निमगाव कोऱ्हाळे गावातील ग्रामस्थ विजय बाळासाहेब कातोरे यांच्या फिर्यादीवरून शिर्ड पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक तपास शिर्डी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गजानन गायकवाड हे करीत आहे मयत अनिकेत यांच्या पश्चात आई, वडील, एक बहिण, असा परिवार आहे. या घटनेनंतर निमगाव कोऱ्हाळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe