Ahmednagar News : पोपटराव शेवाळे यांची आत्महत्या

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : आर्थिक दिवाळखोरीमुळे बंद पडलेल्या श्रीनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन पोपटराव एकनाथ शेवाळे (वय ६३, रा. वडगाव गुप्ता, ता.नगर) यांची राहत्या घरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे.

शेवाळे यांनी ३१ मार्च रोजी सायंकाळी राहत्या घरात विषारी औषध प्राशन केले. त्यांना त्यांच्या कुटुंबीयांनी तातडीने नगरमधील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे उपचार सुरु असताना बुधवारी (दि.३) रात्री ८.४९ च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

मयत शेवाळे यांच्या मृतदेहाचे गुरुवारी (दि.४) सकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयात शव विच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शेवाळे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe