सुप्रिया सुळें म्हणाल्या…आम्ही छत्रपतींचे मावळे, झुकणार नाही

Published on -

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना अटक केली. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीतील अन्य पक्षांकडूनही प्रतिक्रिया येत आहे.

यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही भाजपवर निशाणा साधत, ईडी आणि भाजपवाले एकच असून, ते एकत्रितपणे काम करत आहे, हे दिसत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापरकरून लोकांना त्रास द्यायचा, त्यांना भीती दाखवायची. आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत.

महाराष्ट्र कधी दिल्ली समोर झुकला नाही आणि झुकणारही नाही. संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष आणि आम्ही सर्व नवाब मलिक यांच्या सोबत आहोत. आजही होतो उद्याही राहू आणि आमची लढाई सुरूच ठेवू, अशी आक्रमक प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

ईडीची धाड पडणार आहे, हे भाजप लोकांनी आधीच सांगितले होते. म्हणून आश्चर्य वाटले नाही. मात्र ते इतका अतिरेक करतील, असे वाटले नव्हते. महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात इतकी टोकाची भूमिका कोणीच घेतली नव्हती.

भाजपमधील काही लोक, त्यांचे नेते आणि मंत्री सातत्याने ट्विट करत होते की, १५ दिवसांनी अटक होईल, १५ दिवसांनी रेड पडेल, अर्थातच आता हे खरे झाले आहे. ईडी आणि भाजप एकत्र काम करतात, किंवा एकच आहेत, असा आता अर्थ काढावा लागेल, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!