पक्षविरोधी काम करणाऱ्या भाजपच्या दोन नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- पक्ष विरोधी काम करणाऱ्या नेवासामधील भाजपच्या दोन नगरसेवकांचे पक्षातून निलंबन करण्यात आले आहे.

नगर पंचायतीमधील भाजपकडून निवडून आलेले नगरसेवक रणजित दत्तात्रय सोनवणे व दिनेश प्रताप असे निलंबित करण्यात आलेल्या नगरसेवकांची नावे आहे.

याबाबतचे पत्र भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी दिले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की , वेळोवेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून निरोप येऊनही पक्षाच्याच कार्यक्रमात उपस्थित न राहता विरोधकांच्या प्रत्येक कार्यक्रमात हे दोघेही उपस्थित राहत होते.

यामुळे हि निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती समजते आहे. दरम्यान नगर पंचायतीची दुसरी निवडणूक एप्रिल २०२२ मध्ये होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर शहर व तालुका भाजपच्या तीन बैठका झाल्या आहेत. त्यात प्रभागनिहाय अभ्यास व संपर्क सुरू करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर नेवासा तालुकाध्यक्षपदी भाऊसाहेब फुलारी यांनी त्यांची निवड झाल्यावर शहराध्यक्ष यांच्यासह काही चिटणीसांचे पक्षातून निलंबन केले होते.

त्यानंतर आता दोन नगरसेवकांचे निलंबन करण्यात आले आहे. २०१७ च्या नगर पंचायतीच्या पहिल्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक १५ मधून निवडून आलेले दिनेश व्यवहारे व प्रभाग क्रमांक ९ मधून केवळ एका मताने निवडून आलेले रणजित सोनवणे या दोघांचे पक्षातून निलंबन करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe