नागवडे यांच्या निवासस्थानी ‘स्वाभिमानी’चे अर्धनग्न व मुंडन आंदोलन!

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- श्रीगोंदा येथील नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व त्याच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या अनुराधा राजेंद्र नागवडे यांच्याशी संबंधित कराड येथे गुळाचा कारखाना आहे.

या कारखान्यासाठी याभागातील शेतकऱ्यांकडून घेतलेला ऊस व कामगारांच्या पगारापोटी २ कोटी ५० लाख रूपये थकीत नाहीत. त्यामुळे नागवडे यांच्या वांगदरी येथील निवासस्थानासमोर दि.२७ नोहेंबर रोजी जोपर्यंत ऊस बीले मिळत नाही तो पर्यंत सातारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते अर्धनग्न पध्दतीने ठिय्या व मुंडन आंदोलन करणार आहेत.

नागवडे यांच्या संबंधित असलेला श्रीकांत ॲग्रोटेक इंडस्ट्रिज लिमिटेड सुरली, कराड येथे गुळाचा कारखाना चालु करण्यात आला होता. या कारखान्याने परिसरातील ५५० शेतकऱ्यांचे ऊस बीले तसेच कामगार पगार,वाहतूक तोडणीदारांचे सुमारे २ कोटी ५० लाख रुपये दिलेले नाहीत.

या बिलांची वेळोवेळी मागणी केली असताना त्यांनी ऊडवाउडवीची उत्तरे देत या शेतकऱ्यांनी संपर्क केला तर त्याला प्रतिसाद दिला जात नाही.

त्यामुळे या शेतकऱ्यांच्या उसाची बीले जोपर्यंत दिली जात नाही तोपर्यंत नागवडे यांच्या निवासस्थानासमोर सातारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दि.२७ नोहेंबर पासून शेतकऱ्यांच्या सोबत अर्धनग्न पध्दतीने ठिय्या आंदोलन व मुंडन आंदोलन करणार आहेत.

जर हे आंदोलन झाले तर मात्र आगामी नागवडे कारखान्याच्या निवडणुकीत नागवडे यांच्या विरोधकांना आयते कोलीत मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe