११ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : संपूर्ण देशात बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करण्यासाठी प्रशासनासह राज्यकर्तेही चांगलेच सरसावले आहेत.अशाच पद्धतीने अहिल्यानगर शहराचे आ.संग्रामभैय्या जगताप हे ही बांगलादेशातील घुसखोरांवर कठोर कारवाईसाठी चांगलेच आक्रमक झाले आहेत.आ. जगताप यांनी सोमवारी (दि.१०) समर्थकांसह जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचे या प्रकरणी लक्ष वेधले तसेच महानगरपालिकेतील आयुक्त यशवंत डांगे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.बांगलादेशातील घुसखोरांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी,या मागणी बरोबरच शहरातील बेकायदा अतिक्रमणे हटवा, याकडेही त्यांनी श्री. डांगे यांचे लक्ष वेधले.
ते म्हणाले, अहिल्यानगर शहरातील काही आधार केंद्र, सेतू कार्यालयातून जिहादी टोळीच्या माध्यमातून जाणीवपूर्वक स्थलांतरित बांगलादेशी लोकांना डुबलीकेट आधार कार्ड, रेशन कार्ड ओळखपत्र देण्याचे काम जिहादी विचाराची टोळी करत आहे. भविष्यकाळात बांगलादेशात जशी परिस्थिती निर्माण झाली तशी परिस्थिती निर्माण झाल्यास हेच लोक छाताडावर बसतील. यासाठी हिंदू लोकांनी एकत्र येऊन आवाज उठवण्याचे काम झाले पाहिजेत.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/ईव्हीएम-मशिनची-पडताळणी-होईल-74.jpg)
एका आयडीवर ४ ते ५ सेतू केंद्र चालविले जात आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. जिहादी विचारांचे कार्यालय निर्माण झाले असून जिहादी विचाराचे अधिकारी यांना हाताशी धरून बोगस रहिवासी दाखले दिले जात आहे. गोरा खैरनार सारख्या अधिकाऱ्याला देखील नीट केले जाईल, असा इशारा आ. जगताप यांनी दिला आहे.
तसेच शहरातील बेकायदा बांधकाम, अतिक्रमणे तसेच निवासी बांगलादेशी कारवाईबाबत महापालिकेतील आयुक्ताच्या दालनात ठिया आंदोलन करण्यात आले असून, उपनगरातील अनेक परिसरात बांगलादेशी नागरिक तसेच जिहादी प्रवृत्तीच्या लोकांकडून अनाधिकृत अतिक्रमणे करून जागा बळकवण्याचे प्रकार सर्रासपणे सुरू असल्याचे आयुक्तांना निदर्शनास आणून देत कारवाईची मागणी केली.यावेळी माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, निखिल वारे, सुरेश बनसोडे, वैभव ढाकणे, आकाश दंडवते, केतन क्षीरसागर, विजय सुंबे, संतोष ढाकणे आदी उपस्थित होते.