करदात्यांना सूट द्यावी…आमदार जगतापांचे मनपा आयुक्तांना निवेदन

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :- कोरोनाच्या महाकाय संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली होती. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडला आहे. यातच नगर शहरातील करदात्यापुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

त्या अनुषंगाने करदात्याला कर भरण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देऊन 75 टक्के सूट द्यावी अशी मागणी आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे आमदार संग्राम जगताप यांनी पत्राद्वारे केली.

याबाबत सविस्तर बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले कि, नगर शहरातील करदात्यांनी मला भेटून माझ्याकडे मागणी केली आहे की महापालिकेचा जो मालमत्ता कर आकारते ते भरण्यास नागरिक तयार आहे.

पण काही आर्थिक अडचणीमुळे अनेक करदाते महापालिकेने दिलेल्या मुदतीत कर भरू शकले नाही. यामुळे या करदात्यांना 75 टक्के सूट देऊन

30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ मिळाल्यास अनेक करदाते उस्फूर्तपणे थकबाकी भरण्यास तयार होतील. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात महापालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. तरी करदात्यांना सूट द्यावी अशी मागणी आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे आमदार संग्राम जगताप यांनी केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe