Ahilyanagar News : कोणत्या ना तरी कारणावरून शिक्षक सध्या चर्चेत असतात. आता मात्र कहरच केला असून चक्क किरकोळ कारणावरून शिक्षकाने शिक्षिकेला विद्यार्थ्यांसमोरच शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील मालदाड येथील एका विद्यालयात घडली.
या घटनेमुळे परत एकदा शिक्षक व्यवस्थेचे चांगलेचे वाभाडे निघाले आहेत. याबाबत माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील मालदाड येथील एका विद्यालयातील शिक्षिकेच्या पतीचा वाढदिवस गुरुवारी असल्याने पतीसाठी त्यांनी पुष्पगुच्छ आणला होता. हा पुष्पगुच्छ शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जा असे त्यांनी सांगितल्याने या शिक्षकेने हा पुष्पगुच्छ शाळेमध्ये आणला होता.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/5-1.jpg)
त्यांनी हा पुष्पगुच्छ शाळेतील मुलांना दिला. गुरुवारी दुपारी याच शाळेतील एक शिक्षक दत्तू किसन कोटे यांनी पुष्पगुच्छावरून या शिक्षिकेला टोमणे मारले. या शिक्षकाच्या वागण्याबद्दल संबंधित शिक्षकेने मुख्याध्यापक व शाळेच्या व्यवस्थापनाकडे तक्रार केली. दरम्यान शुक्रवारी सकाळी या शिक्षकाने शिक्षिकेची भेट घेऊन आपला उद्देश वाईट नव्हता असे सांगितले.
यावेळी दोघांमध्ये वादावादी झाली. या शिक्षकाने शिक्षकेला मारहाण केली. यामुळे संतप्त झालेल्या या शिक्षिकेने घुलेवाडी येथील तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली. शिक्षकाविरुद्ध तिने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी विविध कलमान्वये या शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.