अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2022 Ahmednagar News :- एकीकडे महागाई दरदिवशी विक्रमी उच्चांक गाठत आहे. पेट्रोल, डिझेल, खाद्यतेले, मिरची, मसाल्यांसह अनेक वस्तू महाग होत असताना मात्र कांद्याच्या दरात दररोज घट होत असल्याने कांदा उत्पादक हव्व्लडील झाले आहेत.
कांद्याचे भाव असेच कमी होत राहिले तर शेतकऱ्यांच्या डोळ्यात केवळ दुःखाचे अश्रूच दिसून येतील. विशेष बाब म्हणजे महिनाभरापूर्वी कांद्याचे भाव 3000-3200 रूपये क्विंटल होते.
पण त्यानंतर बाजारात कांद्याची आवक वाढली. त्याप्रमाणात मागणी कमी झाल्याने नगर जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागात कांद्याच्या भावात घसरण होऊ लागली आहे.
नुकतेच शनिवारी नगर जिल्ह्यात 1100 रूपयांवर भाव आले आहेत. तब्बल दोन हजारांनी भाव घसरल्याने शेतकरी चिंतेत आहे. जिल्हयातील वांबोरीत 100 ते 1300 रूपये,
कोपरगावात 275 ते 1075, घोडेगाव 500 ते 1100, वैजापूर 300 ते 1205 रूपये भाव निघाले. राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्येही असेच दर होते.
दरम्यान कांद्याचे कोसळणारे दर पाहून बळीराजाच्या डोळ्यातील अश्रू देखील कोसळू लागले आहे. अनेक नैसर्गिक संकटनवर मात करीत पिके जोपासली मात्र भाव मिळेनासा झाल्याने बळीराजा हवालदिल झाला असल्याचे पाहायला मिळते आहे.