लसीकरणासाठी तहसीलदार उतरले रस्त्यावर…दंडात्मक कारवाईमुळे नागरिकांची पळापळ

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :- कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता लसीकरण महत्वाचे बनले आहे. मात्र अद्यापही जिल्ह्यात अनेकांनी लसीचा एकही डोस घेतलेला नसल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे अखेर प्रशासनाने कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.(Vaccination punitive action) 

याचाच प्रत्यय नागरिकांना कोपरगावात आला आहे. करोना महामारीसोबतच अवघ्या जगात ओमीक्रॉन या नव्या संसर्गजन्य आजाराने डोके वर काढले आहे.

यातून बचावासाठी सध्या तरी लसीकरण हाच एकमेव उपाय असल्याने प्रत्येक नागरिकाने लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक असताना अजूनही काही बेफिकीर नागरिकांना याचे गांभीर्य लक्षात येत नसल्याने प्रशासन स्वतः रस्त्यावर उतरले आहे.

यासाठी कोपरगाव शहरात तहसीलदार विजय बोरुडे, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या पथकाने शहरातील आस्थापनांत जाऊन त्या अस्थापनाच्या मालकाची,

कामगारांची व तेथे खरेदी करायला आलेल्या ग्राहकांनी करोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहे की नाही याची प्रत्यक्ष प्रमाणपत्र पाहत पाहणी केली.

यावेळी अस्थापनातील कामगारांनी लस घेतलेली नसेल तर त्या कामगारास 500 रुपये दंड तर दुकान मालकास 10,000 रुपये प्रमाणे कारवाई करण्यात आली

तसेच मास्क न वापरणार्‍या नागरिकांकडून 500 रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आल्याने अनेक दुकान मालकांना प्रशासनाने अचानकपणे लसीकरण तपासणी मोहीम सुरू केल्याने दुकान मालक, कामगार व ग्राहकांची मोठ्या प्रमाणात धावपळ झाली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe