अवैध गुटखा विक्री करणाऱ्या सचिनला स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाआड

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :-  कोपरगाव शहरातील सप्तशृंगी मंदिरा जवळ खडकी परीसरात स्थानिक गुन्हे शाखेने टाकलेल्या छाप्यात 67 हजार रूपयांचा हिरा व गोवा गुटखा जप्त करण्यात आला आहे.(Ahmednagar Crime)

याप्रकरणी सचिन विजय कटाळे यांला अटक करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी कि, सुगंधित तंबाखू गुटखा पान मसाल्याची विक्री शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी राज रोसपणे केली जात होती.

याची खबर मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकाने आरोपी सचिन विजय कटाळे याला ताब्यात घेतले.

सचिनकडे कसून चौकशी केली असता त्याने हा माल शेरखान पठाण राहणार कोपरगाव याच्याकडून विकत घेतला असल्याची कबुली दिली. शेरखान पठाण रेड पडल्याची माहिती मिळताच फरार झाला आहे. आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe