भीषण अपघात ! कंटेनरने दुचाकी धारकाला फरफटत नेले

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑक्टोबर 2021 :- संगमनेर तालुक्यातील माऊली फाट्यावर राष्ट्रीय महामार्ग 50 नाशिक-पुणे महामार्गावर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर मोटरसायकल व आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला.

या अपघातात मोटरसायकलस्वार राजू सोमनाथ वरपे (रा. वरवंडी ता. संगमनेर) चालक जबर जखमी झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,

सदर घटना अपघात दुपारच्या सुमारास झाल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग 50 ट्राफिक पोलीस यांच्या मदतीने वाहन बाजूला घेण्यात आले. तसेच सदर अपघात ग्रस्त व्यक्तीला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान सदर आयशर टेम्पो हा हरियाणा राज्यातील असल्याचे समजते आहे. अपघातग्रस्त झाल्यानंतर कंटेनर चालक वाहन सोडून पसार झालेला आहे.

अपघाताचा पुढील तपास घारगाव पोलीस स्टेशन व राष्ट्रीय महामार्ग 50 चे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात चालू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe