भीषण अपघात; वाहनांचे दरवाजे तोडून जखमींना बाहेर काढले

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :- आज सणासुदीच्या दिवशी बोलेरो आणि कारचा भीषण अपघात झाला. त्यात चार जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात राहाता तालुक्यातील लोणी खुर्द गावाजवळ तळेगाव रस्त्यावर घडला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, बोलेरो लोणी बुद्रुक येथील असून ती लोणी खुर्द येथील स्मशान भूमी जवळून लोणी बुद्रुककडे जाण्यासाठी वळण्याचा तयारीत असताना पाठीमागून आलेल्या कारने तिला जोराची धडक दिली.

या भीषण अपघातात कारचालक व त्याचा सहकारी दोघेही लोणी खुर्द येथील असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, तर बोलेरो मधील दोघेजण लोणी बुद्रुक येथील असून ते किरकोळ जखमी आहेत.

दरम्यान या दोन्ही वाहनामधील जखमींना काचा व दरवाजे तोडून बाहेर काढावे लागले. जखमींवर प्रवरा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe