अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :- टेलरच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत तब्बल तीन लाखांचे नुकसान झाले आहे. ही घटना कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे घडली.
येथील मास्टर टेलर या दुकानाला पहाटेच्या सुमारास आग लागून दुकानांमधील असलेल्या मशीन, विक्रीसाठी आलेले कापड व शिवलेले ड्रेस जळून खाक झाले.
यात टेलर युसुफ हासम शेख त्यांचे तब्बल तीन लाखापेक्षा नुकसान झाले आहे. पहाटे तीन वाजेच्या सुमारास कोपरगाव-संगमनेर महामार्गाच्या बाजूला असलेल्या शनी मंदिर परिसरातील शेख यांच्या टेलरिंग दुकानाला शॉर्टसर्किटने आग लागली.
पहाटे व्यायामासाठी जात असलेल्या स्थानिक तरुणांच्या ही घटना लक्षात आली. त्यांनी तात्काळ भ्रमणध्वनीवरून याबाबत कल्पना दिली.
आग विझविण्यासाठी शंकरराव काळे कारखान्यातील अग्निशमक पथक आले. शर्तीचे प्रयत्न करून दुकानाला लागलेली आग विझवण्यात आली. त्यामुळे शेजारील दुकानांचे नुकसान टळले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम