चोरट्यांची दहशत ! कोण आहे तिकडे…तुझा बाप आहे आलोच समोरून

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था धोक्यात आला आहे. कारण जिल्ह्यात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. दिवसाढवळ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने नागरिक दहशतीखाली वावरू लागले आहे.

तर चोरटे मात्र निर्धास्त आहे. यामुळे चोरट्यांवर अंकुश लावण्यात पोलीस यंत्रणा अयशस्वी ठरते असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच सुप्यात अशीच एक घटना घडली आहे.

सुपा येथील आपधुप रोड लगत राहणार्‍या बबन निवडुंगे यांच्या एकांतातील वस्तीवर 6 जणांच्या टोळीने दरोडा टाकला. यामध्ये विरोध करणार्‍या पती – पत्नीस जबर मारहाण करून जखमी करत 78 हजारांचा ऐवज लांबवला.

याबाबत अधिक माहिती अशी कि, निवडुंगे कुटुंबिय झोपले असताना रात्री 11.30 वाजेच्या सुमारास घरापाठीमागे पत्र्याचा आवाज येत होता.

तेव्हा बबन निवडुंगे यांनी आवाज दिला कोण आहे तिकडे असे विचारले असता तुझा बाप आहे आलोच समोरून असे म्हणत चोरट्यांनी सेफ्टीडोअर कटावणीने तोडले.

निवडुंगे यांनी सर्वांना एका खोलीत बंद करून घेत जवळील वस्तीवरील उमाजी थोरात, चंद्रकांत कोल्हे, रामदास येणारे यांना फोन करून मदत मागितली.

तोपर्यंत दरोडेखोर घरात घुसून त्यांनी बबन निवडुंगे याना मारहाण केली. इतरांना जीवे ठार मारण्याची धमकी देत चोरट्यांनी घरातील कपाट तोडून लॉकरमध्ये ठेवलेले 78 हजारांचे दागिने व इतर ऐवज लुटून पलायन केले.

घटनेची माहिती समजताच सुपा पोलीस घटनास्थळी पोहचले. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन कुमार गोकावे यांच्या मार्गदशनाखाली एपीआय तुकाराम पवार करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe